Shravani Somvar Rashibhavishya: आज, 18 ऑगस्ट 2025, हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे. आज दशमी तिथी संध्याकाळी 5:22 पर्यंत राहील, तर मृगशिरा नक्षत्र मध्यरात्री 2:06 पर्यंत आणि हर्षण योग सकाळी 11:00 वाजेपर्यंत असेल. राहूकाळ सकाळी 7:30 ते 9:00 वाजेपर्यंत आहे, तर अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:56 या वेळेत आहे. आज चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. या शुभदिनी 12 राशींसाठी शिवकृपेचा प्रभाव कसा असेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
मेष: आज महिलांना कामाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याबाबत अनावश्यक चिंता टाळा. मित्रमंडळींची उणीव जाणवेल. तणावापासून दूर राहून सकारात्मक विचार करा.
वृषभ: नवीन माहिती आणि वाचनात रस वाढेल. कौटुंबिक सौख्य वाढेल, पण जोडीदाराबाबत मनात गोंधळ राहील. अपचनाचा त्रास टाळण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या.
मिथुन: पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग किंवा व्यायामाला प्राधान्य द्या. नवीन विचार प्रेरणा देतील. प्रेमात असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
कर्क: घरात कटुता टाळा आणि शांत वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर पडू शकतात. साहस टाळून मध्यम फलदायी दिवसाचा आनंद घ्या.
सिंह: कुटुंबातील गरजा समजून घ्या. कामाचा ताण आणि बौद्धिक थकवा जाणवेल. ध्यानधारणेमुळे मन शांत राहील. संमिश्र घटनांमधून मार्ग काढा.
कन्या: तरुणांनी बेफिकीर वागणे टाळावे. सामाजिक जबाबदारी जपा. सबुरीने वागल्यास फायदा होईल. भौतिक सुखांचा आनंद घ्याल, पण लाभाच्या संधींवर लक्ष ठेवा.
तूळ: कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर अवलंबून राहू नका. भावंडांशी वाद टाळून कामाचे धोरण ठरवा.
वृश्चिक: मनात भीती राहील, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने वागाल. एकांताची गरज जाणवेल. काळजी घ्या, पण घाबरू नका.
धनू: महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील. विरोधक नरमाईने वागतील. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः प्रयत्न करा.
मकर: कर्मठ विचार बाजूला ठेवा. घरात चिडचिड टाळा. कोणाची नाराजी पत्करू नका. कामाची प्रशंसा मिळण्यास वेळ लागेल, पण चिकाटी ठेवा.
कुंभ: कामात स्थिरता राखा. उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामांवर वेळ जाईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवा.
मीन: खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्या. आवडते छंद जोपासा. नकारात्मक विचार टाळून ध्येयासाठी प्रयत्नशील राहा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.