SBI Best Credit Cards: क्रेडिट कार्ड हे आजच्या काळातील एक महत्त्वाचे आर्थिक साधन बनले आहे. रोख रकमेऐवजी खरेदीसाठी किंवा सेवा घेण्यासाठी बँकेकडून किंवा कर्जदात्याकडून ठराविक मर्यादेपर्यंत रक्कम वापरण्याची सुविधा यात मिळते. यामुळे खरेदीसोबतच रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, प्रवासातील सुविधा अशा अनेक फायदे मिळतात.
SBI क्रेडिट कार्ड्स, SBI Cards and Payment Services Ltd. या कंपनीमार्फत जारी केली जातात आणि विविध गरजांसाठी खास सुविधा देतात. यात रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक, फ्युएल सरचार्ज सूट, एअरपोर्ट लाउंज प्रवेश, कॉन्सिएर्ज सर्व्हिसेस, विमा संरक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
चला तर पाहूया SBI चे सर्वाधिक लोकप्रिय ६ क्रेडिट कार्ड्स आणि त्यांची वैशिष्ट्ये :
- SBI Card ELITE
वारंवार प्रवास करणारे आणि प्रीमियम लाइफस्टाइल पसंत करणाऱ्यांसाठी हे कार्ड उपयुक्त आहे. वार्षिक शुल्क ₹4,999 असून, ₹5,000 किमतीचे वेलकम ई-गिफ्ट व्हाउचर, वर्षभरात मोफत चित्रपट तिकिटे, तसेच Club Vistara आणि Trident Privilege सदस्यत्व मोफत मिळते. - SBI Card PRIME
वार्षिक शुल्क ₹2,999. डाइनिंग आणि किराणा खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स, खर्चानुसार गिफ्ट व्हाउचर्स, तसेच देश-विदेशातील एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत प्रवेश सुविधा यामुळे हे प्रीमियम श्रेणीतील ग्राहकांसाठी योग्य आहे. - SimplySAVE SBI Card
रोजच्या खरेदीसाठी बजेट-फ्रेंडली पर्याय. वार्षिक शुल्क फक्त ₹499. डाइनिंग, चित्रपट आणि डिपार्टमेंटल स्टोअर खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. - BPCL SBI Card
वाहनधारकांसाठी खास. BPCL पंपांवर इंधन खरेदीवर कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. त्याचबरोबर दैनंदिन खर्चावरही फायदे मिळतात. - Air India SBI Platinum Card
वारंवार हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय. Air India तिकिटांवर बोनस रिवॉर्ड पॉइंट्स, वेलकम रिवॉर्ड्स आणि एअरपोर्ट लाउंज प्रवेश सुविधा मिळते. - SBI Cashback Card
ऑनलाईन खरेदीदारांसाठी खास आकर्षक कार्ड. ऑनलाईन खरेदीवर ५% पर्यंत कॅशबॅक आणि ऑफलाईन खरेदीवर १% कॅशबॅक. वार्षिक शुल्क ₹999.
पात्रता निकष
- वय: साधारणतः २१ ते ६० वर्षे (कार्डनुसार थोडाफार फरक संभवतो)
- किमान वार्षिक उत्पन्न: ₹३ लाखांपासून पुढे
- पात्रता: नोकरदार, स्वयंरोजगार करणारे व पेन्शनधारक
- चांगला क्रेडिट स्कोर आणि पूर्वीच्या कर्ज/क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये कोणतीही थकबाकी नसणे आवश्यक
अर्ज कसा करावा
SBI च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करता येतो. बँक तुमचे उत्पन्न, क्रेडिट स्कोर आणि इतर आर्थिक बाबी तपासून कार्ड मंजूर करते.