CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पात कोट्यवधींचा महाघोटाळा: १६ कोटींचा प्रकल्प २८० कोटींवर… २३९ कोटी खर्च… पण प्रत्यक्ष काम कुठे?

On: December 14, 2025 8:39 PM
Follow Us:
sarangwadi sangrahak talav ghotala

माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचा जलसंधारण विभाग, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांना सवाल

चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्प प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताचा अड्डा बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पात ठेकेदार वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. पुणे तसेच जलसंधारण विभागातील काही तत्कालीन आणि विद्यमान अधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार व त्यांचे पती यांना सोबत घेऊन कोट्यवधींची लूट चालवली असून १६.६१ कोटीची मूळ निविदा २८०.६४ कोटींवर नेले आहे. यात १७००% वाढ झाली आहे. प्रकल्पावर आतापर्यंत २३९ कोटी खर्च केले… पण प्रत्यक्षात काम कुठे? असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पात कोट्यवधींचा महाघोटाळा या विषयाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जात–पात, पक्ष–अपक्ष विसरून आपला मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मतदान करा- समाजसेवक संतोष गवारे पाटील यांचे आवाहन

माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, आतापर्यंत २२ देयकांद्वारे २३९ कोटी रुपये अदा झाले. पण साइटवरील वस्तुस्थिती वेगळी आहे. माती–मुरूम ‘अभाव’ दाखवून लाखो घनमीटर सामग्री ८, १७ आणि २० किमी अंतराहून आणल्याचे दाखवले. प्रत्यक्षात साइटवरील तीव्र उताराचा रस्ता असल्याने डंपरच चढू शकत नाहीत. असे असताना ९,९४,६६६ घनमीटर सामग्री बाहेरून आणली असल्याचे दाखवण्यात आले. यासाठी डंपरच्या एक लाख ट्रिप लागल्या असत्या. हे प्रत्यक्षात अशक्य आहे. आणि या प्रकल्पात गौण खणिज प्रकल्पातीलच वापरण्यात आले आहे. म्हणजेच कागदोपत्री खोटे आणि प्रत्यक्षात शून्य काम याद्वारे चिखली मतदारसंघातील नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच १२ जुलै २०२१ रोजी अतिरिक्त कामाला मान्यता घेण्यात आली. R.A. Bill No. २० मध्ये ‘पूर्ण काम’ दाखवून २.३८ कोटींचे बिल अदा करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ते काम आता सुरू आहे. हा खूप मोठा विरोधाभास आहे.

कार्यकारी अभियंता अमोल मुंडे व उपअभियंता सचिन शिंदे यांची त्या बिलावर सही आहे. ज्या कामाचा मागमूसही नाही, त्याचे पैसे शासनाकडून उकळले जात आहेत. ही सरळसरळ शासनाची लूट आहे, असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली…नंतर गांजा,बिड्या ओढणे…अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला, पण….

प्रकल्पाच्या किंमतीचा ‘अत्यंत संशयास्पद’ वाढता आलेख

राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, मी आमदार असताना हा प्रकल्प मंजूर केला. तेव्हा २००९ साली प्रकल्पाची मूळ निविदा किंमत- १६.६१ कोटी होती.

  • प्रथम २०२२ मध्ये सुधारित मान्यता- १९७.२१ कोटी
  • द्वितीय २०२४ मध्ये आणखी वाढ- २८०.६४ कोटी

मात्र कामाची गुणवत्ता, गती आणि प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यावरच आहे. इतकी प्रचंड वाढ करूनही काम कुठे आहे? असा सवाल राहुल भाऊ बोंद्रे यांनी उपस्थित केला.

प्रत्यक्ष खुदाई दाखवून द्या : राहुल भाऊ बोंद्रे

जलसंधारण विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांना मी आव्हान देतो की, त्यांनी ८, १७ व २० किमी अंतरावरील ‘खुदाई स्थळ’ प्रत्यक्ष जनतेला दाखवून द्यावे. तसेच खाजगी जमिनीवरील खुदाईची रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावी. कंपनीला गौण खनिज रॉयल्टी संदर्भात २२,५६,५०,४००/- (बावीस कोटी छप्पन लाख पन्नास हजार चारशे रुपये) दंडाचा आदेश पारित करण्यात आला. तहसीलदार मेहकर यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक ५८८/२०१८ दिनांक ३०/१०/२०१८ नुसार सदर आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांना सादर करण्यात आली आहे.

तरी विद्यमान आमदार आणि त्यांचे पती यांनी प्रत्यक्ष साइटवर जाऊन सार्वजनिक खुलासा करावा. आणि जर या लुटीला पाठिंबा देत असाल तर तसे जाहीर करा, असेही राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

तक्रारदारांना धमक्या आणि पोलिसांवर दबाव…

किन्ही नाईक गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ननकर यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. एपीआय निर्मळ यांनी प्रत्यक्ष साइटला भेट देऊन पडताळणीही केली. परंतु अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या पत्रांना प्रतिसाद दिला नाही. विद्यमान आमदार व त्यांचे पती यांनी पोलिसांवर दबाव आणून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून ठेकेदारास काम सुरू करून दिले. उलट तक्रारदारांवर खंडणी मागत असल्याचा आरोप ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला. हा सर्व चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असून हे सर्व मिळून महाघोटाळा दडपण्यासाठी धडपड करत असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पात कोट्यवधींचा महाघोटाळा: १६ कोटींचा प्रकल्प २८० कोटींवर… २३९ कोटी खर्च… पण प्रत्यक्ष काम कुठे?”

Leave a Comment