CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

जात–पात, पक्ष–अपक्ष विसरून आपला मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मतदान करा- समाजसेवक संतोष गवारे पाटील यांचे आवाहन

On: November 20, 2025 5:41 PM
Follow Us:
Santosh Gavare patil ward no 1

चिखली (बातमीवला): चिखली शहरातील राजकीय वातावरणात सध्या समाजसेवक संतोष जनार्दन गवारे पाटील हे नाव विशेष चर्चेत आहे. प्रभाग क्रमांक १ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रथमच उमेदवारी मिळालेल्या या तरुणाने पैशाच्या जोरावर नव्हे, तर दीर्घकाळ केलेल्या समाजकार्यातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आज कोणतीही निवडणूक ही पैशाशिवाय किंवा राजकीय वारसा असल्याशिवाय लढता येत नाही असे सामान्य लोकांचे म्हणणे असते, त्यामुळे ज्यांना खरंच जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते असे तरुण पुढाकार घेत नाहीत. चिखलीसारख्या शहरात जिथे पैशाचा दबदबा राजकारणावर असतो, तिथे संतोष गवारे पाटील यांची उमेदवारी हे एक वेगळेच उदाहरण आहे. गरीबांच्या घरातला मुलगा कष्टाने आणि जनतेच्या पाठिंब्याने नेतृत्व कसे उभे करतो, याची ही जिवंत कहाणी आहे.

संतोष यांच्या आई श्रीमती यमुनाबाई जनार्दन गवारे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तीन मुलांना वाढवले. चिखलीत आल्यावर त्यांच्याकडे फक्त अंगावरचे कपडे, एक पितळेची परात आणि एक तवा एवढेच भांडवल होते. डोक्यावर छत नव्हते, उत्पन्नाची कोणतीच सोय नव्हती, तरीही त्यांनी मिळेल ते काम करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. “मुलांना शिकवेन, त्यांना स्वावलंबी बनवेन,” ही जिद्द त्यांनी कधी सोडली नाही.

या संघर्षात वाढलेला संतोष लहानपणापासूनच कामाला जुंपला गेला. पाचवीपासून चहाच्या टपरीवर काम, सकाळी काम, दुपारी शाळा, रात्री परत काम. घरी एक वेळच्या पोटभर भाकरीचीही सोय नव्हती, तरीही त्याने स्वतःच्या हिमतीवर बी.कॉम. आणि नंतर एम.बी.ए.ची पदवी मिळवली. समाजसेवेची तळमळ मनात असल्यामुळे सरकारी नोकरी मिळवून जनतेचे होईल तेवढे प्रश्न सोडवू या भावनेने काम करता करता सरकारी नोकरीची तयारी केली. पण खूप प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळाली नाही, तरीही त्याने निराश होण्याऐवजी समाजसेवेला आपले आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

समाजसेवा करण्यासाठी फक्त मनातून तळमळ पाहिजे असे ठरवून “ज्या गरीबीत मी वाढलो, ती दुसऱ्यावर येऊ देणार नाही,” असं ठाम मत संतोष यांनी व्यक्त केलं. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहून त्यातच त्याने स्वतःचा छोटेखानी व्यवसाय उभा केला. मात्र त्याचे खरे लक्ष गरीब मुलांच्या शिक्षणावर आणि समाजाच्या प्रश्नांवर राहिले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्याने दिवाळी फराळ वाटप, शालेय साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षेची पुस्तके देणे, गरजूंना तात्काळ मदत, अशा अनेक प्रकारचे समाजसेवेचे काम त्याने त्याच्या क्षमतेनुसार चालू ठेवले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जशी होईल तशी मदत त्याने करायला सुरुवात केली. नंतर वार्डातील पाणीटंचाई, खराब रस्ते, नाल्यांची साफसफाई, अशा एक ना अनेक नागरिकांच्या दैनंदिन अडचणींसाठी तो प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करत राहिला.

ज्यांनी लहानपणापासून संतोषला पाहिले आहे ते स्थानिक नागरिक सांगतात, “संतोष हा मतांसाठी नाही, तर खरंच मनाने मदत करतो. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होतो.” गेल्या अनेक वर्षांपासून तो कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठाशिवाय, निःस्वार्थपणे समाजकार्य करत आहे. आता नगरपालिकेच्या रिंगणात उतरताना तो म्हणतो, यावेळेस “जात-पात, पक्ष-अपक्ष बाजूला ठेवा. फक्त एकदा तुमच्या या मुलाला, मित्राला, भावाला, तुमच्या समाजसेवकाला एक संधी द्या.”

आज कोणतीही निवडणूक ही पैशाशिवाय किंवा राजकीय वारसा असल्याशिवाय लढता येत नाही असे सामान्य लोकांचे म्हणणे असते, त्यामुळे ज्यांना खरंच जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते असे तरुण पुढाकार घेत नाहीत. चिखलीसारख्या शहरात जिथे पैशाचा दबदबा राजकारणावर असतो, तिथे संतोष गवारे पाटील यांची उमेदवारी हे एक वेगळेच उदाहरण आहे. गरीबांच्या घरातला मुलगा कष्टाने आणि जनतेच्या पाठिंब्याने नेतृत्व कसे उभे करतो, याची ही जिवंत कहाणी आहे.

त्यामुळे निवडणूक ही पैशाशिवाय किंवा राजकीय वारसा असल्याशिवाय लढता येत नाही, हा समज प्रभाग क्रमांक १ मधील जनतेला खोडून काढायचा आहे. आता प्रभाग १ मधील जनता काय निर्णय घेते, ही जनता एका समाजसेवकाला न्याय देईल का हे येणारा निकालच सांगेल. पण जर यावेळेस अशा सच्च्या समाजसेवकाला जनतेने नाकारले तर भविष्यात कोणताही गरीबाचा मुलगा राजकारणात येण्याचे स्वप्न पाहणार नाही. आणि जनतेला कायम गडगंज संपत्ती असलेल्या घराणेशाहीला मतदान करून त्यांच्या वारसांचे भविष्य सुरक्षित करण्यातच धन्यता मानवी लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now