CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

रायगढ़ येथे होणाऱ्या राष्ट्रीय मिंस्क बॉक्सिंगसाठी बुलढाणा जिल्ह्यातील गणेश पेरे यांची ऑफिशियल म्हणून निवड

On: December 10, 2025 10:16 PM
Follow Us:
rashtriya mix boxing ganesh pere official

बातमीवाला: रायगढ़ येथे दि. २६ ते २८/१२/२०२५ ला होणारी सहावी राष्ट्रीय मिंस्क बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मिंस्क बॉक्सिंग असोसिएशन व विदर्भ मिंस्क बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख तसेच महाराष्ट्र बॉडीचे आयोजन समिती अध्यक्ष गणेश पेरे सर यांना इंडिया बॉडीचे अध्यक्ष अदिति ताई तटकरे (मंत्री, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य) आणि इंडिया बॉडीचे ग्रँड मास्टर राकेश म्हसकर सर, सचिव इंडिया बॉडी यांच्या वतीने ऑफिशियल म्हणून निवड करण्यात आली आहे.

गणेश पेरे सर यांनी नुकतेच नेपाल येथे झालेल्या एशियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व अत्यंत व्यवस्थित रित्या पार पाडले. त्यांची कामगिरी पाहून त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑफिशियल म्हणून निवडण्यात आली आहे.

यानिमित्त महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत मोहिते, सचिव नारायण साहेब कराळे, टेक्निकल डायरेक्टर सागर शेलार, सचिव रवी बारापात्रे (नागपूर), सचिव विनोद दाढे (नांदेड) तसेच बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी गणेश पेरे सर यांचे अभिनंदन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महाणकर सर, एनआयएस कोच मोहम्मद सोफियान सर, चिखली क्रीडा संयोजक दिलीप लांडकर सर, खो-खो जिल्हा सचिव कैलास करवंदे सर, एनआयएस कोच देवानंद नेमाने सर, एस. जी. सावंत सर, एल. एस. घुबे सर, असलम हिरीवाले, विश्वनाथ शेळके सर, झाकिर चौधरी सर यांच्यासह अनेक क्रीडा मार्गदर्शक व उत्साही क्रीडाप्रेमींनी त्यांचे स्वागत केले.

तसेच युवा उद्योजक वैभव सोळंकी व शुभम सोळंकी (योगिराज स्पोर्ट्स & मेन्स वेअर), भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेनफड राव घुबे साहेब व तालुका उपाध्यक्ष भाजप विष्णु पाटील घुबे, स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ देऊळगाव घुबे, विघ्नहर्ता श्री गणेश मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला असून क्रीडा क्षेत्रात कामगिरीसाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment