Patel Retail Ltd IPO: पटेल रिटेल लिमिटेड कंपनीने 2025 मध्ये ₹242.76 कोटींच्या पब्लिक कम ऑफर फॉर सेलच्या (बुक बिल्डिंग) IPO ची घोषणा केली आहे. या इश्यूअंतर्गत कंपनीकडून 95.20 लाख नव्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे. IPO 19 ऑगस्ट 2025 रोजी खुला होणार असून 21 ऑगस्ट 2025 रोजी बंद होईल. शेअर्सची लिस्टिंग BSE आणि NSE वर 26 ऑगस्ट 2025 रोजी अपेक्षित आहे.
कंपनीकडे 10 रुपयांचा फेस व्हॅल्यूचे शेअर्स असून इश्यू प्राइस बँड ₹237 ते ₹255 दरम्यान आहे. गुंतवणूकदारांसाठी किमान लॉट साईज 58 शेअर्स आहे, ज्यासाठी ₹14,790 ची सुरुवातीची गुंतवणूक लागणार आहे. IPO मधून एकूण 9,520,000 शेअर्सची विक्री होईल, त्यापैकी 44.76% (4,261,050 शेअर्स) रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्ससाठी नियुक्त आहेत.
इस्यूचे वेळापत्रक खालील प्रमाणे:
- खुला: 19 ऑगस्ट 2025
- बंद: 21 ऑगस्ट 2025
- अलॉटमेंट: 22 ऑगस्ट 2025
- रिफंड: 25 ऑगस्ट 2025
- शेअर क्रेडिट व लिस्टिंग: 26 ऑगस्ट 2025
IPO मधील रिझर्व्हेशनच्या बाबतीत ऍंकर इन्व्हेस्टर्सना 17.9% (17,04,420 शेअर्स), कर्मचार्यांसाठी 0.54% (51,000 शेअर्स), नॉन-इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सना 24.87% (23,67,250 शेअर्स), QIBs साठी 11.94% (11,36,280 शेअर्स) आणि रिटेल इन्व्हेस्टर्सना एकूण 44.76% (4,261,050 शेअर्स) हिस्सा राखून ठेवण्यात आला आहे.