CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखली तालुक्यातील या २० गावांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना: ‘परिवर्तन प्रकल्प’ राबविण्याचा मार्ग मोकळा

On: September 18, 2025 7:23 PM
Follow Us:
चिखली तालुक्यातील या २० गावांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना: ‘परिवर्तन प्रकल्प’ राबविण्याचा मार्ग मोकळा

चिखली (बातमीवाला): चिखली तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाश्वत आणि व्यापक सामाजिक-आर्थिक ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी ‘परिवर्तन प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. HDFC CSR अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील खालील २० गावांची निवड करण्यात आली आहे:
आंधई, भरोसा, चंदनपूर, चांधई, दहीगाव, धोत्रा भांगोजी, गांगलगाव, गीरोला, काटोडा, कवठळ, केळवद, खैरव, कोलारा, कोलारी, मेरा खुर्द, रामनगर, रोहडा, सातगाव भुसारी, सोनेवाडी आणि उत्रादा.

भेंडवळच्या घटमांडणी प्रमाणे घडत आहेत या घटना: आजपर्यंत ही भाकीते झाली खरी; वाचा सविस्तर माहिती

ही गावे HDFC CSR यांनी निवडली असून, या गावांमध्ये WOTR संस्था जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने ग्रामविकास आराखडे (GPDP) तयार करणार आहे. या आराखड्यांचे POCRA योजनेसह शासनाच्या अन्य महत्त्वपूर्ण योजनांशी समन्वय साधून अंमलबजावणी केली जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ चिखली तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि युवकांना मिळावा, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या परिवर्तन प्रकल्पात चिखली तालुक्याचा समावेश निश्चित झाला आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाला नवीन गती प्राप्त होणार आहे.

शाश्वत शेती, जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्वावलंबन या सर्व क्षेत्रांत या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

chikhlinews

चिखलीत “संवाद सलोख्याचा”: विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

Rahul Bondre leaked a fake letter on social media against Vidyadhar Mahale

राहुल बोंद्रे यांचेकडून संभ्रम पसरवण्यासाठी गोपनीय पत्र सोशल मीडियावर…?

railway recruitment 2025

उत्तर रेल्वेत ४,११६ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची संधी!

priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

Leave a Comment