CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

On: November 20, 2025 10:40 AM
Follow Us:
काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

चिखली (बातमीवाला): जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंस्कृत व सभ्य शहर म्हणून चिखलीचे उदाहरण दिले जायचे. चिखलीत फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण असायचे. आता मात्र चिखली शहरात विकृतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कमळाचा गळा हा नागरिकांसाठी फास झाला आहे. चिखलीत विकासाचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा डोलारा जिकडे-तिकडे दिसत आहे. चिखली शहरातील नगरपालिकेची ही निवडणूक संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचा विजय असेल. काशिनाथ आप्पांच्या मनात पाप नसून ते शहराच्या सभ्यतेचे व संस्कृतीचे संवर्धन करतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी व्यक्त केला.

बुधवार १९ नोव्हेंबर रोजी चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे मविआचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचाराचा नारळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांच्या सुख-दु:खात धावून जाणारे नगरसेवक, नगराध्यक्ष असतात. मविआचे सर्व उमेदवार २४ तास जनसेवेसाठी कटिबद्ध असणारे आहेत. महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून हीच आपल्या विजयाची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, पक्षनिरीक्षक राजेंद्र राख, प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, संदेश आंबेडकर, महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे, नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष जनार्दन गवारे, ज्योती समाधान बांडे, डॉ. प्रकाश शिंगणे, सौ. उषा साहेबराव डुकरे, श्रीमती सुनिता प्रकाश शिंगणे, रहीम खान पठाण, अंबादास प्रल्हाद खरात, वहीदा बेगम मो. जक्काउल्ला, सौ. सीमा गोपाल देव्हडे, डॉ. मोहम्मद इसरार मो. जब्बार, रवींद्र मदन महाजन, सौ. शितल संतोष देशमुख, सौ. संध्या आनंद बोंद्रे, उबेद अली खान, भाईजान, सौ. रसिका रवी पेटकर, भारत दयाराम मुलचंदानी, सौ. संगीता विजय गाडेकर, गोपाल मोहन गायकवाड, रत्नदीप यशवंत शिनगारे, सौ. स्वाती अमोल लहाने, सौ. सरस्वती पुरुषोत्तम वायाळ, शेख जाकीर शेख यासीन, सौ. सुप्रिया प्रशांतकुमार भटकर, मो. आसिफ मो. शरीफ, आनंद सुभाष गैची, सौ. रजनी निखील जागृत, सौ. अनिता विनोद बनकर, श्रीराम सखाराम झोरे यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष तसेच विविध सेल विभागाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्त्री-पुरुष नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मविआ एकत्र तर महायुतीची आपसातच झुंज : राहुलभाऊ बोंद्रे

सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाने मित्रपक्षाला एकही जागा दिली नाही. परिणामी त्यांना वेगळे लढावे लागत आहे. त्यांच्या मतांत फूट पडली असून दुसरीकडे उबाठाचे प्रा. नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. प्रकाश शिंगणे, संदेश आंबेडकर हे सर्व व त्यांचे सहकारी एकदिलाने आमच्यासोबत आहेत. एकंदरीत महायुतीची आपसातच झुंज असून मविआ एकसंध असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. काशिनाथ आप्पा हे सोज्वळ, सभ्य, सुसंस्कृत असून चिखली शहराला ते जुनी ओळख प्राप्त करून देतील, असेही राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले.

चिखली शहराला भय आणि भ्रष्टाचारमुक्त करणार : काशिनाथ आप्पा बोंद्रे

चिखली शहरात घाणेरडे व विकृत राजकारणाने कळस गाठला आहे. गोरगरिबांची अतिक्रमणे काढली जात असून निष्पाप काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर दरोडा, ३५४ चे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. चिखली शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चिखली नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे मविआचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी सांगितले. बोंद्रे घराण्याने कायमच चिखलीकरांची सेवा करत सभ्यता व सुसंस्कृतपणा जपला आहे. यापुढेही तोच कायम ठेवत चिखलीचा विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.

बोंद्रे, जनता आणि विजय हे नगरपालिकेचे समीकरण : प्रा. नरेंद्र खेडेकर

चिखली शहराच्या विकासासाठी बोंद्रे घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. कर्मयोगी तात्यासाहेब, राहुलभाऊ, प्रियाताई हे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत. त्यांनी कायमच शहराच्या भल्याचा विचार केला. आता काशिनाथ आप्पासारखा शांत, संयमी चेहरा आहे. बोंद्रे, जनता आणि विजय हे नगरपालिकेचे समीकरण असल्याने काशिनाथ आप्पाचाच विजय होणार, असे उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment