CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मलकापूरमध्ये तरुणीवर चाकू हल्ला; तरुणी जखमी, आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

On: November 12, 2025 7:30 PM
Follow Us:
chaku halla malkapur

बातमीवाला: मलकापूर शहर गोकुलधाम परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणीवर अचानक चाकूने वार करून हल्ला करण्यात आला. यानंतर आरोपीने स्वतःवरच चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचा तातडीने तपास सुरू केला असून, शहरात अफवा पसरवू नका, असा इशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोकुलधाम परिसरात राहणारी जान्हवी रवींद्र साळी (२५) तिच्या घरासमोर उभी असताना यशोधाम भागातील शुभम विलास झनके (२९) यांच्याशी तिचा किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद तीव्र झाल्यावर शुभमने सोबत असलेल्या धारदार चाकूने जान्हवीच्या मानेवर वार केले. या हल्ल्याने जान्हवीला गंभीर दुखापत झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने तिची धाकटी बहीण रोशनी रवींद्र साळीने तात्काळ ऑटोरिक्षात बसवून खासगी रुग्णालयात नेली, जिथे डॉक्टरांनी तिची उपचार सुरू केले.

हल्ला करून पळ काढण्याऐवजी आरोपी शुभमने तिथेच स्वतःच्या मानेवर चाकूने वार केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शुभमला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश महल्ले आणि सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळसे यांनी दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन जखमींच्या नातेवाइकांशी बोलणी केली. रोशनी साळी यांच्या तक्रारीवरून शुभम झनके याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण पोलिस सूत्रांनुसार किरकोळ वाद हाच मुख्य मुद्दा असावा. सहायक पोलीस निरीक्षक गजानन कौळसे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. शेजारी, साक्षीदारांची तात्काळ चौकशी केली जात असून, घटनास्थळाची कसून तपासणी सुरू आहे. शहर पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment