Airtel Apple Music: भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आता प्रीपेड ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Apple Music मोफत मिळणार आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी उपलब्ध होती. ही ऑफर एअरटेल थँक्स ॲपमध्ये काही ग्राहकांना दिसू लागली आहे, परंतु कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
Apple Music ऑफर काय आहे?
एअरटेलच्या काही प्रीपेड ग्राहकांना थँक्स ॲपमध्ये Apple Music ची ऑफर दिसत आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Apple Music चे विनामूल्य सबस्क्रिप्शन मिळेल. यानंतर, सबस्क्रिप्शन आपोआप रु. 119 प्रति महिना या दराने नूतनीकरण होईल. ही ऑफर सर्व प्रीपेड प्लॅन्सवर उपलब्ध आहे की फक्त निवडक प्लॅन्सवर, याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र, काही वापरकर्त्यांनी ही ऑफर नॉन-अनलिमिटेड 5G प्लॅनवरही पाहिल्याचे सांगितले आहे, त्यामुळे ती बहुतांश ग्राहकांसाठी खुली असण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स ऐप उघडून “रिवॉर्ड्स” किंवा मुख्य पेजवर Apple Music चा बॅनर तपासावा लागेल. बॅनरवर क्लिक करून सूचनांचे पालन केल्यास मोफत सबस्क्रिप्शन सक्रिय होईल. यानंतर, ग्राहक आयफोन, अँड्रॉइड किंवा डेस्कटॉपवर जाहिरातमुक्त संगीताचा आनंद घेऊ शकतात.
प्रीपेड ग्राहकांसाठी का खास आहे ही ऑफर?
भारतातील बहुतांश प्रीपेड ग्राहक मोफत किंवा जाहिरात-आधारित संगीत अॅप्सवर अवलंबून असतात. सहा महिन्यांचे मोफत Apple Music सबस्क्रिप्शन ग्राहकांना प्रीमियम संगीताचा अनुभव देईल, ज्यामुळे ते एअरटेलशी जोडले राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, Apple Music ची 100 दशलक्ष गाण्यांची लायब्ररी, क्युरेटेड प्लेलिस्ट आणि Apple डिव्हाइसेसशी सुसंगतता यामुळे ही ऑफर संगीतप्रेमींसाठी आकर्षक आहे.