चिखली (बातमीवाला): येथील वळती गावात एकामागोमाग नुकत्याच काही दुःखद घटना घडल्या. गावातील जेष्ठ नेते तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस असलेले स्व. पंजाबराव रामराव धनवे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक दुःखद निधन झाले. या बातमीने जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अशा वेळी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी या शोकाकुल कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन वैयक्तिक भेट घेतली आणि सांत्वन केले.
स्व. पंजाबराव धनवे पाटील यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई इंदुबाई रामरावजी धनवे (माजी पोलीस पाटील), पत्नी अश्विनीताई पंजाबराव धनवे (माजी सरपंच), मुलगी राजकन्या, मुलगा यश, भाऊ भागवतराव धनवे, प्रशांत धनवे आणि परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
याच गावात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ डिसेंबर रोजी आणखी दोन अपघाती मृत्यू झाले ज्यामुळे गावावर तिहेरी आघात झाला. स्व. नरेंद्र प्रभाकर पातुरकर आणि स्व. अंकुश बाळकृष्ण भणगे या दोघांचे अपघाती दुःखद निधन झाले. या दुःखद बातमीची माहिती मिळताच ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी या दोन्ही कुटुंबांनाही भेट देऊन सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले.
स्व. नरेंद्र पातुरकर यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी प्रतिभाताई, दोन मुले, मुली, मोठे भाऊ राजेंद्र पातुरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्व. अंकुश भणगे यांच्या कुटुंबात त्यांच्या आई विमलबाई भणगे, पत्नी लताताई, २ मुले, भाऊ अविनाश भणगे, सुरेश भणगे आणि कुटुंबातील इतर सदस्य हजर होते. या दोन्ही कुटुंबाशी बोलताना मंत्री जाधव यांनी मृत्यूचे कारण जाणून घेतले आणि त्यांचे सांत्वन केले.
या सांत्वन भेटीदरम्यान गावातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि नागरिक उपस्थित होते. यात माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नाना हाडे यांच्यासह सौ. मायाताई म्हस्के, कैलास सेठ भालेकर, सेवानिवृत्त शिक्षक हनुमंतराव धनवे सर आणि तेजराव जगताप सर, शिवाजी धनवे, निलेश धनवे, मोहन धनवे, सिद्धेश्वर जाधव, शशिकांत धनवे, नंदकिशोर पाटील, वैजिनाथ जगताप, घनश्याम जगताप, सतीश जाधव, प्रमोद उगले, वैभव उगले, मनोज पातुरकर यांचा समावेश होता.
प्रतापराव जाधव यांनी या तिन्ही शोकाकुल कुटुंबांना भेटून मृत्यूची कारणे जाणून घेतली आणि त्यानंतर चिखलीचे तहसीलदार काकडे साहेब यांना दूरध्वनी करून या कुटुंबांची चौकशी करण्याचे आणि आवश्यक मदत पुरवण्याचे निर्देश दिले.














