CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

फक्त नगरसेवक नको आम्हाला हवा हक्काचा जनसेवक! प्रभाग १ मध्ये संतोष गवारे पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

On: November 26, 2025 3:22 PM
Follow Us:
santosh gavare patil prabhag 1 a chikhli nagarpalika election

चिखली (बातमीवाला): चिखली नगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना तसेच मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा महाविकास आघाडीचा प्रचार प्रभाग क्रमांक १ मध्ये जोर धरू लागला आहे. चिखलीत राजकीय वातावरण तापलेले असले तरी प्रभाग क्र. १ मध्ये मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू एकच- काँग्रेसचे उमेदवार संतोष गवारे पाटील.

संतोष गवारे पाटील हे साध्या घरातून आलेले व्यक्तिमत्त्व. प्रभाग १ मध्ये अनेक वर्षे सातत्याने सक्रिय राहून नागरिकांच्या प्रश्नांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांची ओळख ‘आपल्या माणसाची’ बनली आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवारीनंतर प्रभागात त्यांच्याबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे. कोणताही आर्थिक आधार तसेच राजकीय वारसा नसल्याने फक्त सामान्य लोकांच्या अडचणींची जाणीव आणि त्यावर उपाय शोधण्याची तळमळ हे त्यांचे मोठे भांडवल मानले जाते.

जात–पात, पक्ष–अपक्ष विसरून आपला मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मतदान करा- समाजसेवक संतोष गवारे पाटील यांचे आवाहन

हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत लहानपणापासूनच समाजकार्याला प्राधान्य दिल्याने त्यांची प्रतिमा जनतेमध्ये विश्वासार्हतेची बनली आहे. “आमचा मुलगा, आमचा भाऊ, आमचा मित्रच उमेदवार” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘नगरसेवक’ आणि ‘जनसेवक’ या दोन प्रतिमांमध्ये खरी लढत रंगणार असल्याच्या चर्चा प्रगल्भ होत आहेत.

नेहमी उपलब्ध राहणारे, सर्वांसाठी काम करण्याची तयारी असलेले आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अग्रक्रम देणारे उमेदवार अशी संतोष गवारे पाटलांची छाप प्रभागात दृढ झाली आहे. त्यामुळे प्रभाग १ मध्ये त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

chikhlinews

चिखलीत “संवाद सलोख्याचा”: विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

Rahul Bondre leaked a fake letter on social media against Vidyadhar Mahale

राहुल बोंद्रे यांचेकडून संभ्रम पसरवण्यासाठी गोपनीय पत्र सोशल मीडियावर…?

chikhli nagarpalika nivadnuk

काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचारसभेला अभूतपूर्व प्रतिसाद…

priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

Santosh Gavare patil ward no 1

जात–पात, पक्ष–अपक्ष विसरून आपला मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मतदान करा- समाजसेवक संतोष गवारे पाटील यांचे आवाहन

Leave a Comment