CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

On: November 21, 2025 1:02 PM
Follow Us:
priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली (बातमीवाला): चिखली नगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून सौ. प्रिती समाधान बांडे-फुलझाडे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाने केली आहे. प्रिती ताईंच्या नावाची अधिकृत घोषणा होताच प्रभागात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभागात गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या जनसंपर्क आणि संवाद यात्रेत महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रिती ताईंना थेट पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांचे शिक्षण, स्वच्छ चारित्र्य आणि जनतेच्या हाकेला धावून जाण्याची हातोटी यामुळे प्रभागातील वातावरण पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने झुकले आहे.

प्रिती बांडे-फुलझाडे या जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या सुशिक्षित उमेदवार आहेत. खाजगी क्षेत्रात त्यांनी व्यवस्थापन, ग्राहक सेवा आणि समन्वय या क्षेत्रात दीर्घकाळ काम केले आहे. त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य आणि संयमी आहे. महिला सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार-कौशल्य विकास, स्वच्छता आणि पर्यावरण या विषयांवर त्या नेहमीच बोलतात आणि कामही करतात.

त्यांचे पती समाधान बांडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून करसल्लागार म्हणून कार्यरत आहेत. प्रभागातील अनेक सामान्य कुटुंबांना त्यांनी आयकर, जीएसटी आणि इतर करसंबंधित बाबींत ते सतत मदत करत असतात. समाधान बांडे यांचा प्रामाणिकपणा आणि सरकारी कार्यालयांशी असलेला चांगला समन्वय यामुळे त्यांचा प्रभागात फार मोठा विश्वास आहे. ते स्वतः रिंगणात नसले तरी प्रिती ताईंच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन आणि जनसंपर्क त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालला आहे. दोघांचा हातात हात घालून चाललेला हा प्रचार प्रभागातील जनतेला खूप भावला आहे.

प्रभागातील नागरिक म्हणतात, ‘‘प्रिती ताईंचे उच्च शिक्षण आणि स्वच्छ दृष्टिकोन, तर समाधान बांडे यांचा प्रचंड अनुभव – ही जोडी प्रभागाला खरंच उत्तम नेतृत्व देईल.’’

प्रिती ताईंनी आपल्या प्रभागासाठी ठोस आश्वासने दिली आहेत. स्वच्छता, पाणी प्रकाशयोजना या मूलभूत सुविधा दुरुस्त करणे, महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांना बळ देणे, तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरे आणि बसण्याची व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळण्याची उद्याने असे अनेक मुद्दे त्यांनी प्राधान्याने घेतले आहेत. तसेच प्रत्येक तक्रार आणि मागणीसाठी ऑनलाइन यंत्रणा उभी करून पारदर्शक कारभाराचे वचन त्यांनी दिले आहे.

जात–पात, पक्ष–अपक्ष विसरून आपला मुलगा, भाऊ, मित्र म्हणून मतदान करा- समाजसेवक संतोष गवारे पाटील यांचे आवाहन

प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधील नागरिकांचा कल स्पष्टपणे प्रिती समाधान बांडे-फुलझाडे यांच्याकडे वळलेला दिसतोय. काँग्रेसचा हात हा प्रभागात मजबूत झाल्याचे चित्र आहे.

आपल्या प्रभागाला स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी प्रिती ताई पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्या आहेत. जनतेच्या आशीर्वादाने त्या नक्की यशस्वी होतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment