CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली…नंतर गांजा,बिड्या ओढणे…अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला, पण….

On: November 14, 2025 11:31 AM
Follow Us:
nagraj manjule struggles in marathi

बातमीवाला: सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यातल्या जेऊर गावातल्या एका वडार समाजाच्या कुटुंबात जन्मलेला एक मुलगा. लहानपणापासूनच अभ्यासात मन रमत नव्हतं, दहावीत नापास झाला. त्यावेळी वेळच वेळ होता, मग वाचनाची गोडी लागली. हातात मिळेल ते पुस्तक वाचू लागला. एकदा एका मित्राकडून ‘मृत्युंजय’ हे पुस्तक मिळालं. त्याने सांगितलं की अशी पुस्तके गावच्या ग्रंथालयात मिळतात. मग तिथे जाऊन सगळी पुस्तके वाचून काढली. रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांमधल्या राक्षसांशी स्वत:ची तुलना करू लागला. आपल्यात बदल घडवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.

शिक्षण पुन्हा सुरू केलं. पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले. संघात सामील झाला, नंतर शिवसेनेत प्रवेश केला. अनेक दंगलींमध्ये भाग घेतला. पण त्यानंतर जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील यांची पुस्तके वाचली आणि विचारधारा पूर्ण बदलली. घरात आंबेडकरांचा फोटो लावण्यासाठी वडिलांशी वाद घातला. भूतकाळ आणि वर्तमानातील उदाहरणे देऊन त्यांना समजावलं. मराठी साहित्यात एम.ए. पूर्ण केलं, नंतर कम्युनिकेशन स्टडीजमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली.

कविता लिहू लागला. एक शॉर्ट फिल्म बनवली, नंतर फँड्री हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याला ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. आज नागराज मंजुळे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत मोठं झालं आहे. त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे.

भविष्यात मोठं होण्यासाठी प्रत्येकाचा भूतकाळ वाईट असावा असं नाही. लहानपणी कसं असतो यावरून भविष्य ठरवू नये. बदलाला संधी द्यावी. माणूस कधीही बदलू शकतो, फक्त स्वत:वरचा विश्वास कायम ठेवावा. वाचाल तर वाचाल, असं म्हणतात. पुस्तकाने विचार सुधारतात आणि सुधारलेलं मन कोणापुढेही सहज झुकत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “ज्याला ७ वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली…नंतर गांजा,बिड्या ओढणे…अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला, पण….”

Leave a Comment