CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मौजे मनुबाईतील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून भाजपचा झेंडा हाती

On: November 13, 2025 10:27 AM
Follow Us:

बातमीवाला: चिखली तालुक्यातील मौजे मनुबाई येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सामील होत पक्षाच्या बळकटीकरणाला हातभार लावला. भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हा  सोहळा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आमदार श्वेता महाले पाटील यांनी सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “विकास हाच आमचा धर्म आणि सेवा हाच आमचा संकल्प,” असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जनतेशी जोडून काम करण्याचे आवाहन केले.

मौजे मनुबाई येथील सरपंच सुखदास वायाळ, सुनील वायाळ, मधुकर वायाळ, कान्होबा वायाळ, प्रताप वायाळ, अक्षय वायाळ, गणेश वायाळ, बद्रिनाथ वायाळ, पुरुषोत्तम वायाळ, भगवान इंगळे, लक्ष्मण जाधव, शरद वायाळ, राजू वायाळ, मदन वायाळ, सागर वायाळ, पवन पडघान यांनी आज पक्षप्रवेश करून भाजपा परिवाराचा भाग बनले.

या कार्यक्रमामुळे चिखली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी दृढ झाली असून “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणाची नवी पायरी यावेळी गाठली गेली आहे.या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष श्री. सागर पुरोहित, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

chikhlinews

चिखलीत “संवाद सलोख्याचा”: विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

Rahul Bondre leaked a fake letter on social media against Vidyadhar Mahale

राहुल बोंद्रे यांचेकडून संभ्रम पसरवण्यासाठी गोपनीय पत्र सोशल मीडियावर…?

chikhli nagarpalika nivadnuk

काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या प्रचारसभेला अभूतपूर्व प्रतिसाद…

santosh gavare patil prabhag 1 a chikhli nagarpalika election

फक्त नगरसेवक नको आम्हाला हवा हक्काचा जनसेवक! प्रभाग १ मध्ये संतोष गवारे पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

Leave a Comment