सिंदखेडराजा (बातमीवाला): येथे ३१ ऑक्टोबरच्या रात्री एक मोठा अपघात झाला. लग्नातून घरी परतणाऱ्या साखरखेर्डा गावातील दोन तरुणांचा यात जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे.
साखरखेड्याचे अल्ताफ शेख अक्रम आणि आरीफ तांबोळी हे दोघे दुसरबीड येथे लग्नाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर ते मोटारसायकल (क्रमांक एमएच-२८/४०२९) वरून घरी निघाले. दुसरबीडजवळील उड्डाणपुलाजवळ त्यांची बाईक डिव्हायडरला जोरात धडकली.
धडक एवढी भीषण होती की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. किनगावराजा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठवले.या दुर्देवी अपघातामुळे संपूर्ण साखरखेर्डा गावावर शोककळा पसरली आहे.














