बुलढाणा (बातमीवाला): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात जालना-खामगाव महामार्गावर एका महिलेच्या मद्यप्रवृत्त अवस्थेने खळबळ उडवून दिली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आणि काही वेळासाठी संपूर्ण महामार्गावर वाहतुकीचा बोजा वाढला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने फिरत असून, लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
या महिलेची वेशभूषा आणि रूपरेषा पाहता ती चांगल्या कुटुंबातील असावी असे वाटते. काळ्या रंगाची साडी नेसलेली ही महिला दिवसा ढवळ्या मद्यप्रवृत्त अवस्थेत रस्त्यावर झोपली. तिची चाल तर पूर्णपणे डळबळीत झाली होती, इतकी की ती रस्त्याच्या मध्यभागी पोहोचताच तोल सोडून रोडवरच पडली. सुरुवातीला लोकांना वाटले की, कदाचित तिला चक्कर आली असावी. त्यामुळे काही तरुण लगेच मदतीसाठी पुढे सरसावले आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जेव्हा ते जवळ जाऊन तिच्याशी बोलले, तेव्हा मात्र सत्य समोर आले. महिलेच्या बोलण्यातून आणि वासाने स्पष्ट झाले की, ती पूर्णपणे मद्यधुंद आहे. यामुळे मदत करायला आलेल्या तरुणांशी तीच भांडण सुरू झाले. तिच्या सोबत एक युवकही होता, जो कारमध्ये बसलेला दिसला. तोही तितक्याच नशेत बुडलेला होता. लोकांनी आधी महिलेला उचलून कारमध्ये बसवले, आणि ती कर मध्ये बसताच पुन्हा बेशुद्ध झाली. नंतर लोकांच्या लक्षात आले की, हा युवकही तितकाच नशेत आहे. त्याला घेराव घालून चौकशी करण्याचा प्रयत्न झाला, पण तो काही बोलण्यास तयार नव्हता.
लोकांच्या गर्दीमुळे घाबरलेला हा युवक महिलेला कारमध्ये टाकताच कार घेऊन पळून गेला. यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ माजला. हा महामार्ग नेहमीच वाहनप्रवण असतो, त्यामुळे क्षणात गर्दी वाढली आणि वाहनांची कोंडी झाली. काही जणांनी घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्दीमुळे वाहतुकीचा प्रवाह काही मिनिटांसाठी पूर्णपणे थांबला होता.















1 thought on “चिखलीजवळ मद्यधुंद महिलेचा भर रस्त्यात राडा! रस्त्यावरच झोपली, गाड्यांच्या रांगाच रांगा, पुढे जे घडलं ते…व्हिडिओ व्हायरल!”