CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

दिवाळीच्या रात्री चोरट्यांचा सुळसुळाट; एकाचवेळी चार घरफोड्या, लाखाचा मुद्देमाल लांबवला

On: October 28, 2025 3:36 PM
Follow Us:
shegaon chori

शेगाव (बातमीवाला): शेगाव शहरात २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री राज राजेश्वर कॉलनी आणि श्रीराम नगर परिसरात एकाच रात्री चार घरफोड्या घडल्या. यात सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घरफोडी राज राजेश्वर कॉलनीतील सोनाली रघुनाथ ढगे (वय ३५) यांच्या घरात झाली. त्या दिवाळी साजरी करण्यासाठी अकोला येथे माहेरी गेल्या होत्या. २६ ऑक्टोबरला घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद आणि कुलूप तुटलेले आढळले. घरात शिरल्यावर अलमारी उघडी आणि सामान विखुरलेले दिसले. त्यातील सोन्या-चांदीचे दागिने मिळून जवळपास ६० हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाला होता.

त्याच कॉलनीत शेजारच्या मनिषा अमितकुमार चंदणगोळे यांच्या घरातूनही चोरट्यांनी हात साफ केला. त्यांच्या घरी सोन्याचे मंगळसूत्र, चेन, अंगठ्या आणि चांदीचे दागिने असे अंदाजे २५ हजार रुपयांचे सामान चोरीला गेले. तिसऱ्या घरफोडीत आशिष मनोहर जुमडे यांच्या घरातील सोन्याचे कानातले बेपत्ता झाले. तर श्रीराम नगरमधील ज्योती सुरेश सरोदे यांच्या घरातून चांदीच्या मूर्त्या, पादुका आणि तोरणे असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला.

चारही घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजांची कुलपे तोडण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा पूर्ण केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment