मुंबई (बातमीवाला): राज्यातील उच्च महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तब्बल ६२०० प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी वित्त विभागाने नुकतीच मंजुरी दिली असून, पुढील महिन्याभरात ही प्रक्रिया प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती देताना शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
या भरती अंतर्गत उच्च महाविद्यालयांमध्ये ५५०० प्राध्यापकांची पदे आणि विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणखी वाढण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, अकृषिक विद्यापीठांमध्ये एकूण २९०० प्राध्यापक पदांपैकी २२९० पदांवर यापूर्वीच नियुक्त्या झाल्या आहेत. आता उर्वरित ७०० पदांसाठी येत्या ३० दिवसांत भरती प्रक्रिया पूर्ण होईल. विशेषतः सोलापूर, पुणे यांसह इतर विद्यापीठांमधील रिक्त पदांसाठी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसांत मुलाखतींचे आयोजन करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…!
या भरतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि १०९ उच्च महाविद्यालयांमधील रिक्त पदांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून काही प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, वित्त विभागाच्या मंजुरीनंतर आता प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय, २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती लवकरच होणार आहे.
लवकरच यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर होईल आणि त्यानंतर ही प्रक्रिया गतिमान होईल. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होईल. ही संधी शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी असल्याचे सांगण्यात येत आहे.














2 thoughts on “राज्यात ६२०० प्राध्यापकांची मेगा भरती लवकरच; वाचा याबाबत सविस्तर माहिती”