NHPC non executive recruitment: राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड (NHPC) ने 2025 साठी कनिष्ठ अभियंता (JE) व विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी एकूण 248 रिक्त जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NHPC च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल. पात्रतेच्या शर्ती व शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या असतील, तसेच उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. मुख्यपरीक्षा ही ऑनलाइन कंप्युटर-बेस्ड टेस्ट (CBT)/लिखित परीक्षा असेल, ज्यामध्ये पुढील टप्प्यात निवड झाल्यानंतर दस्तऐवज पडताळणी व बायोमेट्रिक प्रमाणीकरण होईल. अंतिम नियुक्ती ही यशस्वी दस्तऐवज पडताळणी व वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतरच दिली जाईल.
BEL Bharti 2025: ८० अभियंता पदांसाठी ऑनलाइन अर्ज आणि वॉक-इन टेस्टची संधी, त्वरा करा!
भरतीत खालील पदांचा समावेश आहे:
- सहाय्यक राजभाषा अधिकारी (E01): 11
- कनिष्ठ अभियंता (सिव्हिल): 109
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल): 46
- कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल): 49
- कनिष्ठ अभियंता (E&C): 17
- वरिष्ठ लेखापाल: 10
- पर्यवेक्षक (IT): 1
- हिंदी अनुवादक: 5.
परीक्षेचा नमुना व गुणसंख्या:
- JE, पर्यवेक्षक (IT), वरिष्ठ लेखापाल: 140 प्रश्न संबंधित शाखेवर, 30 सामान्य ज्ञान, 30 बुद्धिमत्ता प्रश्न; एकूण 200 गुण, परीक्षेची वेळ 3 तास
- सहाय्यक राजभाषा अधिकारी/हिंदी अनुवादक: 40 MCQ + 10 वर्णनात्मक प्रश्न, 30 सामान्य ज्ञान, 30 बुद्धिमत्ता; एकूण 200 गुण
- प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण, चुकीसाठी 0.25 गुण वजा; न दिलेल्या उत्तराला गुण नाही.
पगारबाबत:
सहाय्यक राजभाषा अधिकारी (E1) साठी पगार ₹40,000 – ₹1,40,000 (IDA पे स्केल) आहे. इतर पदांचा पगार NHPCच्या नियमानुसार मिळेल.
अर्ज कसा करावा:
- NHPC च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन अर्ज भरा
- संपूर्ण सूचना व पात्रता नीट वाचा
- अर्जातील सर्व माहिती पूर्णपणे आणि काटेकोरपणे भरा
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 2 सप्टेंबर 2025
- अर्ज बंद होण्याची तारीख: 1 ऑक्टोबर 2025