KEM Hospital Vacancy: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि के.ई.एम. रुग्णालय, परळ, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापकांच्या ७८ रिक्त पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ही भरती ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी असून, पात्र उमेदवारांना १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करण्याची संधी आहे. विविध विभागांमधील ही पदे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) निकषांनुसार भरली जाणार असून, इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
भरतीचा तपशील
या भरतीअंतर्गत एकूण ७८ सहाय्यक प्राध्यापक पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. विभागनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- अॅनेस्थेसिया: ७ जागा
- कार्डियाक अॅनेस्थेसिया: १ जागा
- जनरल सर्जरी: ११ जागा
- नवजात शिशुशास्त्र (निओनॅटोलॉजी): २ जागा
- प्रसूती आणि स्त्रीरोग (ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी): ४ जागा
- सी.व्ही.टी.एस.: १ जागा
- छाती वैद्यक (चेस्ट मेडिसिन): १ जागा
- जनरल मेडिसिन: १० जागा
- ऑर्थोपेडिक: १ जागा
- कार्डियोलॉजी: १ जागा
- हिमॅटोलॉजी: १ जागा
- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी: १ जागा
- सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी: १ जागा
- दंतचिकित्सा (डेंटिस्ट्री): १ जागा
- आरोग्य शिक्षण: १ जागा
- शारीररचना (अॅनाटॉमी): ७ जागा
- शारीरक्रियाविज्ञान (फिजियोलॉजी): ४ जागा
- जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री): ८ जागा
- न्यायवैद्यक (फॉरेन्सिक मेडिसिन): ५ जागा
- पॅथॉलॉजी: २ जागा
- औषधशास्त्र (फार्माकॉलॉजी): ६ जागा
- समुदाय वैद्यक (कम्युनिटी मेडिसिन/पीएसएम): २ जागा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- उमेदवारांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमानुसार २०२२ मध्ये निश्चित केलेली किमान शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
- मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात रेसिडेंट/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर म्हणून किमान तीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आवश्यक आहे.
- पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष सिनिअर रजिस्ट्रार म्हणून अनुभव असावा.
- संबंधित विषयात मान्यताप्राप्त पदव्युत्तर/विशेषज्ञता पात्रता आवश्यक आहे.
- उमेदवारांना MS-CIT प्रमाणपत्र आणि दहावीच्या परीक्षेत मराठी विषय उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
महत्वाच्या लिंक्स
वेतन आणि वयोमर्यादा
- वेतन: सहाय्यक प्राध्यापकांना दरमहा १,१०,००० रुपये मानधन मिळेल.
- वयोमर्यादा: जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनुसार किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावी.
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना
- अर्ज विहित नमुन्यात, उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात पूर्ण भरलेला आणि अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह सादर करावा.
- अर्ज सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विभाग प्रमुखांकडे, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ येथे १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात: जन्म प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, वैद्यकीय शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, MMC/MCI नोंदणी, व्यावसायिक विमा पॉलिसी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका, विवाहित महिला उमेदवारांसाठी विवाह प्रमाणपत्र आणि नाव बदलाची गॅझेट प्रत, पॅन कार्ड, आधार कार्ड, MS-CIT प्रमाणपत्र आणि मराठी विषय उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र.
- अपूर्ण किंवा विहित नमुन्यापेक्षा वेगळे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- मुलाखतीचा कार्यक्रम संबंधित विभाग आणि महाविद्यालयाच्या स्थापना विभागात प्रदर्शित केला जाईल. मुलाखतीचे ठिकाण डीन यांचे कार्यालय, सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई असेल.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागेल.
कंत्राटी नियुक्तीच्या अटी
- ही नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून, नियमित नियुक्ती म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही.
- गरजेनुसार कंत्राटी नियुक्ती कोणत्याही वेळी रद्द केली जाऊ शकते.
- निवड झालेल्या उमेदवारांना सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात किंवा आवश्यकतेनुसार इतर महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयांत नियुक्त केले जाऊ शकते.
- निवडलेल्या उमेदवारांना केवळ रजा नियमांनुसार प्रासंगिक रजा (Casual Leave) मिळेल, इतर कोणत्याही प्रकारच्या रजेसाठी पात्रता नसेल.
- राजीनामा देण्यासाठी एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल.