Thane Mahanagarpalika Bharti: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ठाणे महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील तब्बल १,७७३ रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. प्रशासकीय, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय सेवांसह विविध विभागांतील रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया आज, १२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ही संधी गमावू नका, कारण ठाणे महानगरपालिकेची ही भरती तरुणांना करिअरची नवी दिशा देणारी आहे!
या भरतीअंतर्गत सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, फायरमन, चालक-यंत्रचालक यासह ६५ विविध संवर्गांतील पदे भरली जाणार आहेत. सर्वाधिक जागा नर्स मिडवाईफ/परिचारिका (४५७ जागा) आणि फायरमन (३८१ जागा) या पदांसाठी आहेत, तर चालक-यंत्रचालक पदासाठी २०७ जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.thanecity.gov.in) उपलब्ध आहेत. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून, अर्जाची अंतिम मुदत २ सप्टेंबर २०२५, रात्री ११:५९ पर्यंत आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये, तर मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९०० रुपये आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना शुल्कात पूर्ण सूट देण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावे लागेल. लक्षात ठेवा, शुल्क परताव्याजोगे नाही.
महत्वाच्या लिंक्स
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज फक्त ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.thanecity.gov.in) सादर करावेत.
- ऑनलाइन प्रवेशपत्रे परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होतील.
- परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र याबाबतची माहिती प्रवेशपत्रात नमूद असेल.
- तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२२-६१०८७५२० आणि जाहिरातीसंदर्भातील प्रश्नांसाठी ०२२-२५४१५४९९ (सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३०) उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व अटी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आरक्षणासंदर्भातील तपशील काळजीपूर्वक तपासावेत.